सोलापूर : सेंट्रल जीएसटी पुणे झोन आणि सेंट्रल जीएसटी पुणे-II आयुक्तालय द्वारे सोलापूर जीएसटी कार्यालयामध्ये “जीएसटी कायदा आणि प्रक्रियामधील अलीकडील बदल” या विषयावर “करदाता संपर्क कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम विशेषतः सोलापूर, बार्शी आणि पंढरपूर येथील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, जीएसटी प्रॅक्टिशनर्स आणि व्यापारी संस्थांसाठी आयोजित केला गेला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम. टाटा, मुख्य आयुक्त, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम पुणे झोन हे होते तसेच यांच्यासह दिलीप गोयल आयुक्त, CGST पुणे-II आयुक्तालय आणि श्रीमती वैशाली पतंगे, अतिरिक्त आयुक्त, CGST पुणे-II आयुक्तालय या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या करदाता संपर्क कार्यक्रमात करदाते, टॅक्स प्रॅक्टिशनर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि एमएसएमईचे प्रतिनिधी, ट्रेड असोसिएशन उदा. सोलापूर चार्टर्ड अकाउंटंट अससोसिएशन, सोलापूर टॅक्स प्रॅक्टिशनर्स अससोसिएशन, इन्कम टॅक्स आणि सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि विविध कंन्सल्टंट्स, कर दाते आणि उत्पादक अशा 50 हून अधिक व्यक्तींनी हजेरी लावली होती.
सदर करदाता संपर्क कार्यक्रम सहभागींना चांगल्या प्रकारे समजावा या हेतूने हा कार्यक्रम मराठी तसेच हिंदी भाषेत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या सुचेनावरून ट्रान्सिशनल क्रेडिट भारण्याबाबतचे CBIC नवी दिल्ली ने दिलेले निर्देश, GST रिटर्न भारण्याबाबतचे निर्देश तसेच ४७ व्या GST कौन्सिल च्या शिफारशीनुसार अमलात आलेल्या GST कायदा आणि अनुपालन संदर्भात मराठी भाषेमधून एक PPT प्रेसेंटेशन सुद्धा करण्यात आले. करदाते, तसेच व्यापारी संघटनांच्या GST आणि त्याच्या अनुपालनासंबंधी शंकांचे जसे GST Registration, Claiming of Input Tax Credit, Refunds on Inverted duty Structure, Extended time लिमिट फॉर filing ऑफ Annual रिटर्न इत्यादी चे निरसन CGST अधिकाऱ्यांनी केले. तसेच GST कायद्याच्या धोरणात्मक बदलांबद्दल निवेदन CGST अधिकाऱ्यांनी स्वीकारले. सदर निवेदन GST Policy विंग, नवी दिल्ली येथे पाठपुरावा करण्यासाठी पाठवण्याचे आश्वासनही याप्रसंगी CGST अधिकाऱ्यांनी निवेदनकर्त्यांना दिले.