सोलापूर –सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त यांच्या कार्यालयात आज आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासमवेत महापालिका अधिकाऱ्यांनी दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने घेतली शपथ.यावेळी उपायुक्त धनराज पांडे, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, सहाय्यक आयुक्त सुनील माने, सहाय्यक आयुक्त सौ.पुष्पांजली भगत ,कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर,कर संकलन प्रमुख प्रदीप ताडसरे,नगर सचिव तथा कामगार कल्याण अधिकारी प्रवीण दंतकाळे,पंडित वडतीले,राहुल नागमोती,राजू मंजरतकर,नितीन गायकवाड,पंडित जानकर,अनुराधा कवेकर,रुपाली दाशी तसेच आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने महापालिकेच्या सर्व विभागामध्ये विभागप्रमुख यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांच्या समवेत आपल्या विभागात शपथ घेतली.