• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, August 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या हजार कोटीच्या सॉफ्टवेअर उद्योगात आपले स्वागत !

by Yes News Marathi
August 14, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या हजार कोटीच्या सॉफ्टवेअर उद्योगात आपले स्वागत !
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : इंग्रजी बोलता येणाऱ्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ह्यात सगळ्यात जास्त विश्वासहार्त आकडेवारी म्हणजे लोकसंख्येच्या साधारण 10% किंवा 12.5 कोटी लोक बीबीसीच्या 2012 च्या सर्वेक्षणानुसार सोलापुरात साधारण 1.28 लाख लोकांना इंग्रजी बोलता येण्याचा आकडेवारी येते. जास्त लोकांना इंग्रजी बोलता येणे म्हणजे जास्त प्रमाणात सॉफ्टवेअर व्यवसाय मिळणार. बरेचसे सॉफ्टवेअर बनविण्याचे आणि वापरण्यासाठी इंग्रजीचा उपयोग केला जातो. स्थानिक भाषेत आणि प्रादेशिक भाषेत बाजारपेठ उपलब्ध आहे परंतु हि बाजारपेठ मंद गतीने वाढतेय.


नॅसकॉम (Nasscom) द्वारे प्रसिद्ध केलेल्या इंडिया टेकेड(India Techade) ह्या पाहणीत 19,100 कोटी अमेरिकन डॉलर (USD 191 billion) सॉफ्टवेअर व्यवसाय झाला. त्यात स्थानिक बाजारपेठचा सॉफ्टवेअर व्यवसाय 4400 अमेरिकन डॉलर (USD 44 billion)इतका आहे. 1991 च्या जागतिकरणानंतर भारताने जगातून आयटीच्या मोठ्या बाजारपेठेचे दार उघडले . दर वर्षी सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यवसायाची वाढ लक्षणीय आहे. आणि पर्यायाने देशाच्या जीडीपी मध्ये त्याची भर पडते. सॉफ्टवेअर निर्यातीचे आकडे हे स्थानिक बाजारपेठेतील व्यवसायाच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे. हा गुणोत्तर देशाच्या बहुतांशी भागांसाठी सारखाच आहे, सोलापूर सह.भौगोलिक दृष्ट्या सोलापूर हे शहर अत्यंत चांगल्या ठिकाणी वसलेले आहे. ह्या जिल्ह्याला कर्नाटक आणि तेलंगणा राज्याचे सीमा शेजारी येतात. एक विशेष संस्कृती आणि परंपरा ह्या शहराला लाभली आहे. ह्यात मराठी, कन्नड आणि तेलगू बोलणारी लोकसंख्या बहुतांश आहे. सोलापूरला इतर काही व्यावसायिक दृष्ट्या मोठी शहरं लागतच आहेत. ह्यात मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि बेंगलोर सारख्या शहरांचा समाविष्ट करता येईल. सोलापूरचे रेल्वे स्टेशन हे जंक्शन स्टेशन असून दक्षिण भारतातील रेल्वेसाठी प्रमुख मार्ग आहे.


महामारीच्या काळापासून प्रत्येक कंपनीचे पूर्वी पासूनचे काम करण्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत. आयटी सॉफ्टवेअर कंपनीसह, इतर अनेक प्रकारच्या कंपनीनी घरात बसून काम करण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक कंपन्यांनी पुढील काही दशकांसाठी आपल्या कामासाठी कर्मचारी घरी कसे काम करू शकतील ह्याचे योजना बनविले आहेत. ह्या बदलाचे वारे सोलापुरातही वाहू लागले. एका अंदाजित आकडेवारीनुसार साधारण २५ हजार इंजिनिअर्स महामारीच्या काळात सोलापुरात म्हणजे आपल्या मूळगावी परतून काम करीत आहेत हि खूप मोठी संधी आहे, महामारीचे सावट असतानाही मोठी संधी उपलब्ध होत आहे.


सॉफ्टवेअर/ आयटी कंपनी करिता लागणारे सर्वात महत्वाचे रिसोर्स म्हणजे कौशल्य असलेले मनुष्य बळ. ह्या करिता सोलापुरात शिक्षण संस्था, प्रशिक्षण केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी, सोलापूर जिल्ह्यात इंजिनिअरींग शिक्षण देणाऱ्या कॉलेजेस असून त्यात 13 पदविका, 10 बीई/ बीटेक, 6 ME/MTech, 3 पीएचडी संशोधन समावेश आहे.

सोलापुरात साधारण 20 आयटी कंपन्या असून त्यांच्या द्वारे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाले आहेत. त्यांच्या द्वारे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाले आहेत. एकत्रीत रित्या, म्हणजे सोलापुरातील आयटी कंपन्या आणि वर्कफ्रॉम होम काम करणारे इंजिनिअर्सची आकडेवारी लक्षात घेता एकंदरीत रु. 877 कोटी ( 1252 दशलक्ष अमेरिकन डॉलर) सोलापूरच्या एक हजार कोटी रुपये आयटी/सॉफ्टवेअर क्षेत्रात आपले स्वागत आहे. आम्हाला अजून काही सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. अद्यावत आयटी आणि इन्क्युबेशन सेंटर ची गरज आहे. विमानतळ, मनोरंजन आणि पिकनिकसाठीचे आणखीन काही प्रेक्षणीय स्थळे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाण आणि वापरात नसलेली शासकीय इमारती नव्याने बांधकाम करून आयटी क्षेत्रासाठी योग्य असे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करता येईल.


सोलापूर शहरातील आयटी क्षेत्रात पुढाकार घेत सोलापूर “स्मार्ट सिटी” ह्यांनी एक निविदा आयटी इन्क्युबेशन सेंटर साठी उघडले आहे. हा लेख लिहिताना ह्या इन्क्युबेशन सेंटर बाबतीतच्या सध्या स्थितीची प्रगती बाबतीत काही माहिती मिळू शकली नाही. इन्क्युबेशन सेंटर मध्ये ह्या उद्योगासाठी लागणारे विविध सुविधा आणि पाठबळ शासन आणि इतर योग्य तज्ञाकडून दिले जाते. आयआयटी आणि इतर काही संस्थानी इन्क्युबेशन सेंटर्स सुरु केले आहेत. ह्याच्या माध्यमातून नवोदित उद्योजक आणि उत्तम आयडिया असणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योग सुरु करण्यास विविध सुविधा उपलब्ध होतात मार्केटींगसाठी सुध्दा अनेक सोयी, सुविधा उपलब्ध केले जातात . सोलापूर स्मार्ट सिटीच्या इन्क्युबेशन सेंटरमुळे सोलापूर आयटी साठी बराच प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.


सोलापुरातील आयटी सॉफ्टवेअरसाठी काही उद्योजकांचे मनोगत मी पुढे सादर करतोय.
जेआर इग्नाईट ( JR Ignite) : गेली शतकाहून अधिक काळापर्यत सोलापुरातील एक मोठे उद्योजक आणि अनेकांना रोजगार मिळवून देणारी संस्था म्हणजे जामश्री भविष्याची वेध घेणारे २ लाख वर्ग फूट जागेत उपलब्ध बिजनेस पार्क सोलापुरात निर्माण झाले. 2017 सालात महिंद्रा इंटिग्रेटेड बिजनेस सोल्युशन (MIBS) ह्यांनी सहा सीटचे प्रायोगिक तत्वावर जेआर इग्नाईट(JR Ignite) येथे सुरु केले. पुढील २४ महिन्यात इंटिग्रेटेड बिजनेस सोल्युशन ह्यांनी 600 सीट पर्यतचे प्रगती केली.
“जेआर इग्नाईट(JR Ignite) च्या माध्यमातून अनेक फायदे आहेत. त्यापैकी 25% पगारात बचत, कर्मचारी काम सोडण्याचे प्रमाण कमी होते, कॉस्ट टू कंपनी टायर -1 च्या शहरांपेक्षा फार कमी आणि नऊ भाषांचे उपलब्धता ” अशी माहिती जामश्री रिओरिटि लिमिटेडचे श्री राजेश दमाणी ह्यांनी दिली.
अर्थ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. हि इंटरप्राईज ऍप्लिकेशन निर्मिती करणारी कंपनी आहे. अर्थ सोल्युशन ह्यांच्या संस्थेत 54 सॉफ्टवेअर इंजिनिअर्स कार्यरत असून योग्य बुद्धिमत्ता असणाऱ्या आणखीन बरेच उमेदवारांना घेण्याचा त्यांचा मानस आहे. “आम्ही सोलापूर आणि सभोवतालच्या भागातील कॉलेजमधून विद्यार्थ्यांना नोकरीस घेतले आहे. आणि काही अनुभवी उमेदवारांना हि घेतले आहे. आम्ही LearnQoch.com ह्या उत्पादनासाठी निर्मिती आणि सहायत्ता टीम सोलापुरात उपलब्ध केले आहे. तसेच ह्या सोबत आम्ही ईव्ही(EV) संबंधित रिटेल आणि बिजनेस युजर्ससाठी सोय 2022 पर्यंत करण्याचा योजना केली आहे.” अशी माहिती अर्थ सोल्युशनचे अविनाश गवळी ह्यांनी दिली.
एक्वायर आईटी पार्क (Equire IT Park) हे सोलापुरातील आयटी संबंधीत जगभर सेवा पुरविणारी कंपनी आहे. “आम्ही प्रामुख्याने वेबसाईट सॉफ्टवेअर आणि मोबाईल ऍप्स बनवितो, सध्या आमच्या टीममध्ये 20 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा समावेश आहे. अशी प्रतिक्रिया एक्वायर आईटी पार्क (Equire IT Park) संस्थेचे निखिलेश्वर नीली ह्यांनी दिली.

लेखक शाम येमूल हे इंटेलीसॉफ्ट कॉम्पुटर कंन्सल्टंट्स प्रा. लि. चे प्रमुख असून गेली दोन दशके ते आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. नवोदित उद्योजकतेसाठी ते नेहमी प्रेरणा देतात. नवोदित उद्योजक आणि संस्था ह्यांना ते नेहमीच प्रोत्साहन देतात.

Previous Post

उद्यापासून सोलापुरातील व्यापाऱ्यांना स्वातंत्र्य ! मात्र हे टेंशन?

Next Post

सोलापूर शहरात नवीन १० व्यक्तींना कोरोना

Next Post
सोलापूर शहरात नवीन १० व्यक्तींना कोरोना

सोलापूर शहरात नवीन १० व्यक्तींना कोरोना

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group