सोलापूर महापालिकेच्या माझी वसुंधरा अभियान भीती चित्र स्पर्धेचा निकाल जाहीर

0
21

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत महापौर व आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली “माझी वसुंधरा अभियान” व “राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रमाची” अंमलबजावणी करणेचे काम प्रगतीपथावर असुन शहरातील सौंदर्य वाढविणे करिता विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या भिंतीवर पर्यावरण संवर्धनबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जाणीवजागृती करणे करिता पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व वाढते प्रदूषणबाबत उपाय योजनाबाबत भित्तीचित्रे काढून शहर स्वच्छ, सुंदर व हरित करून जनजागृती करणेकरिता दि.३१/१२/२०२१ रोजी रंगभवन चौक येथील मोकळ्या भिंती बोलक्या करणेकामी “राज्यस्तरीय पर्यावरणपुरक भित्तीचित्र स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

१.स्वच्छ,सुंदर व हरित सोलापूर.
२.माझी वसुंधरा संवर्धन
३.सोलापुरातील ऐतिहासिक वैभव

या विषयावर नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी जाणीवजागृती करत चित्रे रेखाटली असून शहरातील नागरिकांकडून कौतुक देखील करण्यात येत आहे.
सदर स्पर्धेचा निकाल श्री धनराज पांडे (उपायुक्त) यांचे अध्यक्षतेखाली व विक्रमसिंह पाटील (सहा आयुक्त), सचिन खरात (प्रसिद्ध चित्रकार), स्वप्नील सोलनकर (पर्यावरण अधिकारी) यांचे गठीत समितीकडून खालीलप्रमाणे काढण्यात येत आहेत. सदर बक्षीस प्राप्त स्पर्धकास अनुक्रमे प्रथम पारितोषिक र.रु.२५,०००/- द्वितीय पारितोषिक र.रु.१५,०००/- व तृतीय पारितोषिक र.रु.११,०००/- तसेच उत्तेजनार्थ र.रु.५०००/- एकुण ५ पारितोषिके व सहभाग प्रमाणपत्र सोमवार दि.१७/०१/२०२२ रोजी मा महापौर यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार आहेत.