IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचा सावट!

0
21

IPL 2022: देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढील हंगाम दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत खेळला जाऊ शकतो. देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर, आयपीएल 2022 दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत हलवण्याचा बीसीसीआय विचार करीत आहे. यापूर्वीही भारतातील निवडणुकांमुळं 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत टी-20 लीगचं आयोजन करण्यात आलं होतं.

आयपीएल 2022 चे आयोजन दक्षिण आफ्रिकेत केल्यास सामन्यांच्या वेळेतही बदल होईल. युएईमध्ये संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सर्वाधिक सामने खेळले गेले. तर, डबल-हेडर सामने दुपारी 3:30 वाजता सुरू झाले. परंतु दक्षिण आफ्रिकेत ही वेळ बदलेल आणि सामना दुपारी चार वाजल्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या बीसीसीआयकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्याचं चित्र येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होऊ शकते.