सोलापूर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेस सुरुवात…

0
34

सोलापूर – सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार दि. १८ जून रोजी सुयश गुरुकुल, विजापूर रोड येथे आयोजित केले गेले असून केल्वीनेटर ने पुरस्कृत केल्या आहेत. स्पर्धेचा शुभारंभ सुयश गुरूकुल चे केशव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र राठी, सचिव ओंकार दाते, आंतरराष्ट्रीय पंच शशांक कुलकर्णी उपस्थीत होते.

या स्पर्धेत एकूण २६७ मॅचेस होणार असून हा उच्चांक असल्याचे अध्यक्ष जितेंद्र राठी यांनी सांगितले. सर्वाधिक स्पर्धक १५ वर्षाखालील गटात ४५ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. ह्याचाच अर्थ म्हणजे सोलापुरात बॅडमिंटन चे महती वाढत आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे.

प्रथम दिवशी स्पर्धेचे निकाल

१० वर्षाखालील मुले एकेरी
१. विश्वम बाहेती वि तेजस घाटगे (१५-८, १५-१२)
२. अद्वैत पवार वि तन्मय रत्नपारखी( १५-४, १५-३
३. मयंक माने वि मोमीन ( १५-९, १५-४)

१५ वर्षाखालील मुली एकेरी
१. पूर्वा तापडिया वि साईश्री डींग्रे (१२-१५, १५-६, १७-१५)
२. नूर अत्नुरकर वि सामथा बनसोडे ( १५-९, १५-४)
३. श्रेया म्हेत्रे वि सिमरन इराबत्ती (१५-७, ११-१५, १५-१०)
४. श्रीनी मोरे वि मनस्वी कुरणावळ ( १५-७, १५-१)
५. जिया सय्यद वि प्राजक्ता जाधव ( १५-१०, ९-१५, १५-१०)
६. संतोषी दोळ वि तनिष्का पाटील ( १५-१२, १५-९)

१७ वर्षाखालील मुले एकेरी
१. सुमित भांडारकवठेकर वि सुमित आवटे ( १५-५, १५-१०)
२. अंशुल गोसावी वि प्रसाद मोरे ( १५-८, १५-९)
३. ओंकार हरलेकर वि कार्तिक ललवाणी ( १५-४, १५-८).
४. राजवर्धन वळसंगकर वि सार्थक कुलकर्णी (१५-११, १५-८)
५. अभिनव पवार वि माधव हिंगमिरे ( १५-८,१५-१०)
६. सक्षम शिरगीरे वि तनिष चुंबळकर ( १५-१०, १५-८)

१५ वर्षाखालील मिश्र दुहेरी
१. मित बजाज, अक्षरा यादव वि प्रणित कावरे, तनिष्का पाटील ( २१-१५, २२-२०)
२. आर्यन करकमकर, श्रावणी सावंत वि कृष्णा गुंडेवार, कार्तिक भालवनकर ( २१-२, २१-८)
३. शिवरुद्र मुळे, श्रींनी मोरे वि आदित्य मेटकरी, जिया सय्यद ( १५-५, १५-१०)