सोलापूर : सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी गरजू विध्यार्थ्यांसाठी विद्यादानाचे पवित्र काम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे गौरवोद्गार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यावतीने समाजातील अडीच हजार गरजू विध्यार्थ्यांना वह्या वाटपाचा अर्थात विद्यादानाचा सोहळा पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी विजापूर वेशीतील अजीज प्लाझा येथे पार पडला . यावेळी पालकमंत्री भरणे बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते महेश कोठे,मनपा गटनेते किसन जाधव, चेतन गायकवाड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले,सोलापूर शहरात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा मोलाचा वाटा आहे. राजकारण करत असताना सामाजिक बांधिलकी जपनेसुद्धा तितकेच महत्वाचे असते.आणि जुबेर बागवान यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याप्रती प्रेम दाखवत अडीच विध्यार्थ्यांना १० हजार वह्या वाटपाचा संकल्प करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. जुबेर हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. पक्षावर त्यांचे नितांत प्रेम आहे. याची दखल पक्षाने घेतलेली असून येत्या १५ दिवसात त्यांच्यावर मोठी जबाबदारी येणार असल्याचे सांगत पालकमंत्री भरणे यांनी गोड बातमीसाठी १५ दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला.नेमकी जबाबदारी कोणती हे त्यांनी सांगितले नसले तरी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद त्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. जुबेर बागवान यांनीसुद्धा त्याला दुजोरा दिला आहे.
प्रारंभी प्रास्ताविक करताना युवकाचे शहराध्यक्ष जुबेर बागवान म्हणाले,गेली दोन वर्षे संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे.अजूनही कोरोनाने आपली पाठ सोडलेली नाही.त्यातच सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग – व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.मोठे उद्योजक आणि व्यापारी तर मेटाकुटीला आले आहेतच परंतु दररोज हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.जगणे तर मुश्किल बनलेच परंतु गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.दोन वर्षे शिक्षणापासून मुले वंचित राहिली आहेत. अनेक गरजूं मुलांना साधा पेन विकत घेणेसुद्धा मुश्किल बनणे आहे.शिक्षणाचे होणारे आभाळ लक्षात घेऊन सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरात गरजू मुला-मुलींना १० हजार वह्या वाटपाचा संकल्प सोडला आहे.या विद्यादान सोहळ्याच्या माध्यमातून छोटीशी मदत म्हणून वह्या वाटप करण्यात येत आहेत.अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याच्या उद्देशातूनच गरजूंपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाला बळ देण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कमी पडणार नाही.
या कार्यक्रमास रमीज कारभारी, संपन्न दिवाकर,अहमद मासूलदार, फारुख मटके,विवेक फुटाणे, रियाज मोमीन,पिंटू जक्का,आशिष बसवंती,महेश पवार,जावीद कोतकुंडे ,सर्फराज बागवान, मुसा आतार, जाहीर गोलंदाज, रोहन उडाणशिव, याहया कांबले,तुषार जक्का,हरीस बागवान,आशिष जेठीथोर,गफूर शेख, अयुब पठाण,रियाज आतार,इरफान शेख,राहुल काटे,खालिद जमखंडी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद मासूलदार यांनी केले.