येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडकामासाठी चार जणांनी निविदा भरल्या होत्या. यालाही जवळपास आता महिन्याचा कालावधी लोटला आहे .यातील बेल्लारी येथील एक कोटी वीस लाखांची निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे लवकरच त्या कंपनीला पाड कामाची वर्कऑर्डर दिली जाणार आहे मात्र पाडकामाचा संपूर्ण म्हणजे एक कोटी 20 लाखाचा खर्च महापालिका सिद्धेश्वर कारखान्याकडून वसूल करणार आहे. त्यामुळे कारखान्याला आता महापालिकेच्या मंजुरीशिवाय बांधलेली चिमणी चांगलीच महागात पडणार आहे