सोलापूर प्रतिनिधी : घटस्थापनेपासून (ता. 15) श्री क्षेत्र खंडोबा यात्रेला प्रारंभ झाला असून त्यानंतर पुढील चार रविवारी यात्रा भरते. बाळे येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतात. मात्र, कोरोनामुळे आता यात्रा रद्द करुन धार्मिक विधीसाठी मानकरी व पुजाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. किमान 50 जण उपस्थितीत राहतील, असेही पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.