जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात संस्थेचे संस्थापक जेष्ठ नेते शिक्षण महर्षी विष्णुपंत( तात्यासाहेब) कोठे यांची 87 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते किसनजी मेकाले गुरुजी, स्नेही ए.डी. चिनीवारसाहेब, एस न्यूज चैनल चे संपादक शिवाजी सुरवसे, संस्थेच्या संचालिका डॉ. संचालिका राधिकाताई चिलका मॅडम, मुकुंद चंदनशिवे शाळेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार सर यांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक नागेशकुमार काटकर सर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती माता व स्व. तात्या साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बिभीषण सिरसट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी स्व. तात्या साहेबांच्या जीवन कार्यावर कृतज्ञता पर गीत सादर केले.
यावेळी सार्थक चव्हाण, जरीना शेख, झेबा शेख या विद्यार्थ्यांनी तात्या साहेबांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवाजी सुरवसे म्हणाले, तात्यासाहेब हे किंगमेकर होते त्यांनी अनेक राजकारणी घडवले त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून जीवनात कार्य करत राहावे. किसन मेकाले गुरुजी म्हणाले, विद्यार्थ्यांनी तात्या साहेबा विषयी केलेल्या भाषणांनी मी भारावून गेलो, तात्यासाहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन मंगल बिराजदार मॅडम यांनी केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम यांनी केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून जयंती सप्ताह दरम्यान शाळेच्या वतीने चित्रकला,रंगभरण,वक्तृत्व, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शांताई अनाथाश्रम नीलम नगर या ठिकाणी मुलांना व इतर ठिकाणी 87 चादरींचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.