मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालंय. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत कार्यरत होते. कॅन्सरची झुंज अपयशी झाल्याने विजय कदम यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. अंधरी येथील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या निधनाने हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.