सोलापूर महापालिकेकडे निधीची कमतरता नाही मात्र गरज नसणारी कामे करणे ही जणू रीतच झाली आहे. सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक टॉयलेट साठी अकरा लाख रुपये शहरात सुमारे तीन कोटी रुपयांचे ई टॉयलेट बांधण्यात आले. त्याची अवस्था काय आहे हे सोलापूरकर डोळ्यांनी पाहत आहेत. आता केंद्र शासनाकडून महापालिकेला पाच कोटी रुपये मिळणार असून यातून शहरात पाच ठिकाणी एसी टॉयलेट बांधण्याचा घाट सोलापूर महापालिकेने घातला आहे. आजवर अनेक महिला महापौर झाले. शहराला शितल तेली उगले यांच्या माध्यमातून महिला आयुक्त तसेच सारिका अकोलवार यांच्या माध्यमातून महिला नगर अभियंता मिळाले. तरीही शहरात एकही महिलांसाठी टॉयलेट बांधले नाही हे दुर्दैव. शहरात महिलांसाठी एकही जिम किंवा एकही विशेष गार्डन नाही. असे असताना आता एसी टॉयलेट बांधले जाणार आहेत. हे नक्की कौतुकास्पद काम आहे मात्र त्याची देखभाल दुरुस्ती कोण करणारा हा खरा प्रश्न आहे. कारण शहरात बांधलेली ई टॉयलेट, एलईडी प्लाझा, सिद्धेश्वर तलावात सुरू केलेला लाईट अँड म्युझिक शो, तलाव भोवती फिरणारी रेल्वे गाडी, सिद्धेश्वर मंदिराशेजारी बांधलेले अम्युजमेंट पार्क मेंटेनन्स वाचून धूळ खात पडले आहेत. सोलापूरला जे एन एन यु आर एम योजनेतून तब्बल दोनशे बस मिळाल्या त्यांची अवस्था भंगारात किलोवर विकण्यासारखी झाली आहे. अशातच पुन्हा सोलापूर महापलिकेला शंभर ई बसेस मिळणार आहेत आणि पाच कोटी रुपये तून महापालिका एसी टॉयलेट बांधणार आहेत. ह्या दोन बातम्या शहरवासीयांच डोकं ठिकाणावर आहे का? हे तपासणार्या आहेत.