तसेच राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्या साठी एकलाख पोस्टकार्ड मोहीम…
सोलापूर: २६ जुन राजर्षी शाहू महाराजांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त सोमवारी सोलापूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लोकराजा फाऊंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शाहू महाराज यांची जयंती साजरी करून शाहू महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध १०० वर्षानंतर ही कायम आहे व त्यांचे विचार व कार्य समाजाला प्रेरणा व दिशा देणारे आहे असा संदेश यातुन देण्यात आले .
शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान केला त्यांच्या विचारांना साजेशी जयंती ही सोलापुरात साजरी करण्यात आली.
यावेळी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने तसेच , समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, कुंदन ताकमोगे सुशांत वाघचौरे अशोक दिलपाक अनिल लंकेश्वर विद्या नारायणकर प्रतीक बिराजदार, ईश्वर होगले आदी मान्यवर तसेच तमाम शाहूप्रेमींची ही उपस्थिती होते..