येस न्युज मराठी नेटवर्क : जगभरात विविध कंपन्या करोनाची लस शोधथ आहेत. कोणती लस बाजारात आधी येणार? यासंबंधीही प्रश्न विचारले जात आहेत. तर दुसरीकडे करोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. हे लॉबिंग करणाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम सुरू आहे या यादीत नाव यावं म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत आहेत असाही आरोप होतो आहे. या सगळ्यावर भाष्य करत राजेश टोपे यांनी सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देणार असं त्यांनी म्हटलं आहे.