सोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या (राज्यमंत्री दर्जा) अध्यक्षपदी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे उपसचिव एपी शिंगाडे यांनी पाटील यांच्या निवडीचा अध्यादेश जारी केला आहे. अनगर अप्पर तहसीलच्या विरोधासाठी मोहोळ बंदचे आवाहन केलेले असतानाही या काळात माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेचे जोरदार स्वागत केले. या यात्रेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. ही यात्रा यशस्वीपणे पार पडल्यानंतर लगेच राजन पाटील यांना हे बक्षीस मिळाल्यामुळे मोहोळ तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.