उत्तर सोलापूर तालुक्यातील तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा संपन्न
सोलापूर दिनांक 12 : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 अंतर्गत पालक, नागरिक, स्वयंपाकी, मदतनीस, यांच्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना
सुदृढ भारताची शक्तिमान पिढी तयार करण्यासाठी पोष्टीक तृणधान्ययुक्त सकस आहार पालकांनी मुलांना देणे काळाची गरज आहे असेप्रतिपादन
बापूराव जमादार माजी गटशिक्षणाधिकारी तथा (अधीक्षक) यांनी केले याप्रसंगी माधवी शिंदे पर्यवेक्षक महिला बाल विकास विभाग,चनविरप्पा धत्तरगी (आरोग्य विभाग सोलापूर), सुरेश राठोड (कृषी विस्तार अधिकारी)आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माधवी शिंदे ,चनविर घतरगी यांनी तृणधान्ये , भरड धान्य, रानभाज्या चे आदीचे महत्त्व विशद केले. भारताची भावी पिढी सुदृढ व सक्षम बनविण्यासाठी खाद्याचे संस्कार खूप महत्त्वाचे असतात त्यासाठी तृणधान्य कडधान्य ,पालेभाज्या, फळे याचा समावेश करावा असे उपदेश केले सुरेश राठोड यांनी मुलांनी जंक फूड पॅकेट फूड बेकरी फूड हे शरीराला घातक असल्याने खाण्याचे टाळावे असे मार्गदर्शन केले.
यावेळी तालुक्यातील नान्नज, कलमन, डोनगाव देगाव, शेळगीइत्यादी 6 केंद्रातून स्पर्धक उपस्थित होते.
सदरील स्पर्धेचां निकाल खालील प्रमाणे
प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयाचे पारितोषिक सोनाली सुरवसे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज 2)यांनी पटकवले. द्वितीय क्रमांकाचे 3500 चे पारितोषक मजरेवाडी जिल्हा परिषद पार्वती ख्याड व डोणगाव येथील स्वयंपाकी मदतनीस बचतगटाच्या सारीका वाघमारे यांनी पटकवले तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषक पडसाळी येथील अश्विनी कापसे यांनी मिळवले उतेजनार्थ अनुसया राठोड (प्रताप नगर जिल्हा परिषद शाळा) रूपाली गायकवाड (शेटे वस्ती जिल्हा परिषद शाळा उत्तर सोलापूर) यांनी पटकवले सदर स्पर्धेचे नियोजन मुख्याध्यापक शिवानंद भिमनवरू व सर्व शिक्षक मजरेवाडी जिल्हा परिषद शाळा यांनीउत्कृष्ठरित्या केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश राचेटी व उपस्थित सर्वांचे आभार डाटा एंट्री ऑपरेटर महताब शेख यांनी मानले. सदर स्पर्धा संपन्न करण्यासाठीं कैलास भडोळे ,आबास शेख, आदी नी विशेष परिश्रम घेतले