• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑटोरिक्षा चालक हिताविरोधी धोरणाचा निषेध

Yes News Marathi by Yes News Marathi
January 10, 2024
in इतर घडामोडी
0
ऑटोरिक्षा चालक हिताविरोधी धोरणाचा निषेध
0
SHARES
0
VIEWS

भारतीय न्याय संहिता २०२३ हिट अंड रन कायदा रद्द करा- रिक्षाचालक कृती समितीची मागणी

सोलापूर :- सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षाचालक हिताविरोधी निर्णयास संघटनेची संमती घेण्यासाठी आज दि. १० जानेवारी २०२३ रोजी बैठक आयोजित केली. बैठकीच्या विषयात रिक्षा चालकांच्या गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या मागण्याबाबत कसलाच विचार करण्यात आला नाही. सोलापूर शहरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता रिक्षाची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली. पुण्यासारख्या रिक्षा चालकाच्या आर्थिक मिळकत दुप्पटीने असलेल्या पुणे शहरात एलपीजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा २० वर्षे व सीएनजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा २५ वर्षे अशी वाढवून दिली आहे. मा. केंद्र शासनाने वाहनाच्या वयोमर्यादेबाबत नवीन नियम करून कांही अटी शर्तींचा समावेश करून वाहनांचे नूतनीकरण करून देण्यासंदर्भात अधिसूचना काढूनही सोलापूर कार्यालय जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान करत आहे. गेल्या ४ वर्षापासून केवळ रिक्षा चालकांच्या विषयांवर बैठका घेऊन “बोलाची कढी बोलाचा भात” असे धोरण सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय राबवत असल्याने आज रोजीच्या आयोजित बैठकीत कृती समितीचे सर्व पदाधिकारी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन धारण करत कार्यालयाच्या या वृत्तीचा निषेध केला आहे.

सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात बहुतांश चाचण्या या नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाकडून करण्यात येते. हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक त्यांच्या मनाला येईल ते नियम करून रिक्षा चालकांची पिळवणूक करण्यात येते. नागरिकांच्या सनदेप्रमाणे कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही. आर्थिक कारणांवरून कामात दिरंगाई होत असते. या व अशा अनेक बाबींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करूनही कारवाई होत नसल्याने इक प्रकारचा असंतोष चालकांमध्ये वाढत आहे.

केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता २०२३ मध्ये दुरुस्ती करून हिट अँड रन कायद्याअंतर्गत १० वर्षेशिक्षा व ७ लाख रुपये दंडाची तरतूद केल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून ठीक ठिकाणी या कायद्याविरोधात सनदशीर मार्गाने आंदोलने होत आहेत. या हिट अँड रन कायद्यामधून रिक्षा चालकही सुटलेला नाही. म्हणून याची जाणीव ठेवून भविष्यात या कायद्याविरोधात उग्र आंदोलन करण्याची तयारी रिक्षा चालकांनी करावी असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन मा. शासनाने हिट अँड रन कायद्यातील जाचक तरतूदी मागे घेऊन हा कायदा रद्द करावा अशी या निमित्ताने मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलन प्रसंगी कृती समितीचे श्री अजीज खान, सलीम मुल्ला, आरिफ मणियार, सुनील भोसले, अनिल मोरे, कमलाकर, रफिक पिरजादे, रियाज सय्यद, हमीद दौलताबाद, शौकत बडेघर शौकत सय्यद,मंगेश मानेकमलाकर वाघमारे ,मल्लीकार्जुन‌बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते

Previous Post

ऊसतोडी कामगार कुटुंबांना 300 ब्लँकेटचे वाटप

Next Post

धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीची मिरवणूक;मानकरी कुंभारकडून हिरेहब्बूकडे सुपूर्द

Related Posts

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे
इतर घडामोडी

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

August 17, 2026
मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न
इतर घडामोडी

मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

August 17, 2026
भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!
इतर घडामोडी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!

August 17, 2026
Next Post
धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीची मिरवणूक;मानकरी कुंभारकडून हिरेहब्बूकडे सुपूर्द

धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीची मिरवणूक;मानकरी कुंभारकडून हिरेहब्बूकडे सुपूर्द

ताज्या बातम्या

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026