• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोविड लसीकरणाचे योग्य नियोजन करा पालकसचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2021
in मुख्य बातमी
0
कोविड लसीकरणाचे योग्य नियोजन करा पालकसचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्या सूचना
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर,दि.8: राज्यात कोरोना लस देण्याची तयारी सुरू असून सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकसचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी दिल्या.

        व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून श्री. रेड्डी यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, माता व बाल संगोपन अधिकारी तथा कोरोना लसीचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते यांच्यासह सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

         रेड्डी यांनी जिल्ह्यातील कोविड, लसीकरण तयारी, केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना, रोजगार हमी, स्वयंरोजगार, उद्योग, विमानतळ याबाबत सविस्तर आढावा घेतला. 

         रेड्डी म्हणाले, आरटीपीसीआर चाचण्या वाढवून कोरोनामुळे होणारे मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील रहा. लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक रूग्णांची योग्य काळजी घ्या. रब्बी पीक कर्जासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीकडे (एसएलबीसी) पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले. 

        सोलापूर जिल्ह्यात गुंतवणूक वाढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. यासाठी गुंतवणूकदारांच्या बैठका घेऊन त्यांना महत्व पटवून द्या. स्वयंरोजगाराचा वेळोवेळी आढावा घ्या. औद्योगिक विकास, उद्योग वाढीसाठी विमानतळाचा विषय महत्वाचा आहे. शहरातील विमानतळाच्या शेजारील कारखान्याच्या चिमणीचा विषय त्वरित मार्गी लावा. सुसज्ज विमानतळ असेल तर गुंतवणूकदार, उद्योगपती याठिकाणी येतील. जिल्ह्यातील प्रत्येक विषयाची संक्षिप्त फाईल माझ्याकडे पाठवा, शासन दरबारी प्रयत्न करून विषय मार्गी लावू. आयटी पार्कसाठीही शासन दरबारी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. 

रेड्डी यांनी प्रत्येकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

       शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाविषयक आणि लसीकरणाच्या तयारीबाबत माहिती दिली. आतापर्यंत जिल्ह्यात 49 हजार 599 कोरोनाचे रूग्ण आढळून आले, यापैकी 1740 रूग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूदर 3.3 टक्के असून कमी करण्यास यश आले आहे. सध्या 738 रूग्ण उपचाराधिन असून 94 टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या सुरू असून आता आरटीपीसीआर चाचण्या वाढविणार आहोत. 

        जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार चाचण्या होत नाहीत. लॅबची संख्या कमी पडत असल्याने खाजगी तीन लॅबची मदत घेण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात रोज 1500 चाचण्या होतील अशी मशिन खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी होत असल्याने 25 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलपैकी चार सुरू आहेत. जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन पार पडला. लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत निरीक्षण केले, त्यानुसार प्रत्यक्ष लसीकरण करताना योग्य नियोजन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 जणांना कोरोनाची लस देणार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतर, बालके आणि महिला हॉस्पिटलच्या निधीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती त्यांनी केली. 

       शिवशंकर यांनी सांगितले की, शहरात चाचण्या वाढवून मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या 28 हॉस्पिटलमध्ये कोविडचे बेड रिकामे आहेत. शहरातील उड्डाण पूलासाठी भूसंपादन प्रक्रिया आणि अंतर्गत गटाराची कामे याबाबत निधीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. 

        स्वामी यांनी जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आणि महाआवास योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात 28 हजार घरांचे उद्दिष्ट असून 10 हजार 58 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. 31 मार्चपर्यंत घरांचे काम पूर्ण  करणार आहे. जलजीवन मिशनद्वारे एक लाख तीन हजार घरांना नळाद्वारे पाणी दिले. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून जिल्ह्यात 9 ते 12 वीच्या 95 टक्के शाळा 13 नोव्हेंबरपासून सुरू असून 60 टक्के विद्यार्थी येत आहेत. पाचवी ते 8 वीच्या शाळा 12 जानेवारीनंतर सुरू करण्यासाठी पूर्व तयारी सुरू असल्याची माहिती स्वामी यांनी दिली यशवंते यांनी उद्योग कर्जाबाबत माहिती दिली.
Previous Post

भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यापीठातर्फे 16 जानेवारीला प्रवेश परीक्षा

Next Post

माजी सैनिकांनी पेट्रोलपंप चालविणेसाठी 12 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
Next Post
माजी सैनिकांनी पेट्रोलपंप चालविणेसाठी 12 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

माजी सैनिकांनी पेट्रोलपंप चालविणेसाठी 12 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026