सोलापूर : विनापरवाना विक्रीसाठी स्वत:च्या जवळ काळवीटाची शिंगे बाळगल्याप्रकरणी एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच शिंगे हस्तगत करण्यात आले आहेत. हि कारवाई १६ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
काळवीटाची शिंगे बेकायदा विक्री करण्यासाठी एका इसम बाळीवेस येथे येणार असल्याची माहिती, गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने बाळीवेस येथे सापळा रचला, तेव्हां एक इसम तेथे आला. सांगण्यात आलेले वर्णन व संशयास्पद हलचालीवरून पथका त्याच्या जवळ गेले. झडती घेतली असता, त्याच्या जवळ १८ इंच लांबीचे दोन, १४ इंच लांबीचे दोन तर १० इंच लांबीचा एक असे एकूण पाच शिंगे आढळून आले. खात्री केली असता, हि शिंगे काळवीटाची असल्याचे लक्षात आले.