येस न्युज नेटवर्क : इस्रायल-हमास युद्धात पाच तासांचा युद्धविराम लागू करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार 11.30 वाजता इस्रायल-हमास संघर्षात 5 तासांचा युद्धविराम सुरू झाला आहे. इस्रायल-हमास युद्ध सुरु होऊन आज दहावा दिवस आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्ष काही थांबवण्याचं नाव घेत नाही. हल्ल्यानंतर इस्रायलने हमासला नेस्तनाभूत करण्याची शपथ घेतली आहे. इस्रायली सैन्याने गाझाला वेढा घातला आहे.
पाच तासांचा युद्धविराम सुरू झाला असून यावेळी, अनेक देशांमधून पाठवण्यात आलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत इस्रायल-गाझा सीमेवर असलेल्या रफाह क्रॉसिंगद्वारे दक्षिण गाझाला पाठवली जाणार आहे. यामध्ये सुमारे 1000 टन मदत सामग्री 100 ट्रकद्वारे दक्षिण गाझा येथे नेली जाईल. या जीवनावश्यक वस्तूंचं वितरण संयुक्त राष्ट्राद्वारे केलं जाईल. इस्रायलचं सैन्य मोठ्या संख्येने गाझाच्या सीमेवर तैनात असून हमास विरोधातील मोठं ग्राउंड ऑपरेशन कधीही सुरू होऊ शकतं.