ब्रह्मदेवदादा माने पॉलीटेक्निक येथे डिप्लोमा इंजीनियरिंगसाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांसाठी किशोरवयीन मानसिकता आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीपरावजी माने उपाध्यक्ष , मा. डॉ. पृथ्वीराज माने, सचिवा मा. जयश्री माने, संकुलाचे संचालक मा. प्रा.राहुल माने, प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कॉलेजमधील विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सोलापुरातील सुप्रसिद्ध आणि नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हर्षल थडसरे हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रथम वर्षाचे विभागप्रमुख प्रा. पूनम खंडागळे यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या वयाचा आणि मानसिकतेचा विचार करून, त्यांच्या मनातील अनेक प्रश्नाचा विचार करून हे विशेष व्याख्यान आयोजित केले असल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे उदघाट्न सुप्रसिद्ध आणि नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हर्षल थडसरे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी आणि उपस्थित इतर मान्यवरांच्या शुभहस्ते कै. ब्रम्हदेवदादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाले . त्यानंतर संस्थेकडून प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध आणि नामवंत मनोविकारतज्ज्ञ डॉ. हर्षल थडसरे यांचा सत्कार बुके आणि शाल देऊन कॉलेज प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुप्रसिद्ध आणि नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हर्षल थडसरे यांनी किशोरवयात आल्यानंतर त्या वयोगटातील मुलांच्या मानसिकतेत कशा प्रकारे बदल होतात हे विविध उदारहणे देत समजावून सांगितले. अशा वेळी झालेल्या बदलांना सामोरे जात असताना मुलांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे देखील आवर्जून सांगितले. सध्याच्या जगात ताणतणावाची कारणे अनेक असल्याचे सांगताना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासातील अवघड विषयाची मनामध्ये तयार झालेली भीती, स्मार्टफोनचा अतिवापर, आहारातील बदल, दैनंदिन व्यायामाचा अभाव अशा प्रकारची अनेक कारणे असल्याचे सांगितले. ताण-तणाव येणे किंवा निर्माण होणे ही गोष्ट आपल्या हातात नसली तरी त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करता येऊ शकते याचे सखोल मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
विशेष व्याख्यानाचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. पूनम खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले. यासोबत प्रा.पवन माने, प्रा. जितेंद्र आवटी, प्रा. परमेश्वरी पुरुडे, प्रा. ऐश्वर्या रणदिवे, प्रा. विलास साळुंखे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सचिन फुलारी, . मयूर आवताडे, श्रीनाथ कबाडे , कृष्णात बडवणे, अंजू खलसोडे या सर्वांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन जाधव यांनी केले तर उपस्थित प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार प्रा. समाधान गायकवाड यांनी मानले.