वांगी मध्ये मुलीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी घेतले आरोग्य शिबीर

0
20

६५ सर्वसामान्य नागरिकांनी घेतले या शिबीराचे लाभ

येस न्युज मराठी नेटवर्क : दक्षिण सोलापूर येथील वांगीचे सामाजिक कार्यकर्ते कबीर तांडूरे यांनी आपली कन्या नाजमीन कबीर तांडूरे हिचा ५ वा वाढदिवस आपल्याच वांगी गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य शिबीर राबवून साजरा केला. या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोफत तपासणी व प्रथमोपचार औषधे या अशा सुविधा दिल्या.यावेळी वांगी चे सरपंच श्यामराव हांडे सामाजिक कार्यकर्ते धर्मराज खडाखडे ,संदीप तोडकरी ,मौला शेख ,चंदू टेलर, विजयकुमार सलामपुरे, भगवान भोई, कबीर तांडूरे, परवीन शेख डॉ.विनयरेखा एस. मायकलवर सिस्टर आयेशा तांडूरे, सिस्टर मुमताज नदाफ, पी.आर.ओ. वाले महादेवी मावशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.