मेडशिंगी येथील दादासो पाटोळे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकेतर पुरस्कार

0
14

सांगोला : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या पीडीएफ वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय मेडशिंगी चे सेवक श्री दादासो विठ्ठल पाटोळे यांना काल रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, फॅबटेक उद्योग समूहाचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर, सांगोला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रभूचंद्र झपके, जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष भारत इंगवले, यांच्या हस्ते संपन्न झाला .यावेळी पाटोळे कुटुंबीयांसह देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व पालक व मेडशिंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदरचा आदर्श शिक्षकेतर पुरस्कार दादासो पाटोळे यांना मिळाल्याबद्दल मेडिसिन परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.