सोलापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरांमध्ये जनविश्वास सप्ताह साजरा होत आहे त्या अनुषंगाने बाळे येथील प्रभाग क्रमांक 05 चे बिज्जु प्रधाने लोकप्रिय माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळे येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना प्रधाने यांनी या बाळे परिसरातील जिल्हा परिषद महापालिका सर्व शाळेमध्ये वेळोवेळी शैक्षणिक साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भेट देण्यात येत असते तसेच आजच्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त आणि तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या मंदाकिनी तोडकरी त्यांच्या भाषणात बोलताना बाळेतील सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत असताना दादांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व उपस्थित विद्यार्थ्याकडून आणि सर्व पदाधिकाऱ्याकडून अजित दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते किशोर पाटील बिज्जु प्रधाने मदन क्षिरसागर सुरेश तोडकरी मारुती तोडकरी सुनील भोसले दीपक जगताप अमोघ सिद्ध खराडे मनोज शेरला शामराव गांगर्डे सोमनाथ शिंदे सागर भोसले नागनाथ शिरसागर निशांत कांबळे रवी काळे बाळासाहेब तांबे
महिला पदाधिकारी मंदाकिनीताई तोडकरी मंजुषा डोईफोडे कल्पना क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.