सोलापुरातील विश्वभूषण विदयालय व धाराशिव जिल्हयातील वाशी येथिल कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविदयालय या शाळांना सॅनेटरी पॅड वेंडींग मशीन व इन्सीनेटर मशीन बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडीयांच्याहस्ते बालाजी अमाईन्स येथिल कार्यालयात भेट देण्यात आले. या दोन्ही शाळेत व महाविदयालयात मुलींची संख्या जास्त असल्याने मुलींना त्या दिवसाच्या अडचणीत त्यांना शाळेत सॅनेटरी पॅड उपलब्ध व्हावेत त्या करीता त्रास होऊ नये या करीता बालाजी अमाईन्सच्या सी एस आर अंर्तगत सॅनेटरी पॅड वेंडींग मशीन व इन्सीनेटर मशीन भेट देण्यात आले.
या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडीसर मल्लिनाथ बिराजदार तांत्रिक सल्लागार, विश्वभूषन शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवेसर, रामचंद्र व्हनकडेसर, कर्मवीर मामासाहेब जगदाळे वाशी कॉलेज चे प्राचार्य डॉ. अरुण गंभीरेसर व सदाशिव मानेसर, गंभीरे मॅडम बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, तसेच शाळेतील विदयार्थीनी व शिक्षक उपस्थित होते.
या प्रसंगी विदयार्थीना व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी मार्गदर्शन केले दोन्ही शाळेत सॅनेटरी पॅड वेडिंग मशिन व इनसिनेटर मशीन बसऊन दिल्याबददल प्रचार्य डॉ गंभीरेसर यांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे आभार व्यक्त केले.