येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने स्वाध्यायमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकाविल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड व माध्यमिक शिक्षणाधिकारी बाबर यांचा गौरव मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करण्यात आला. तसेच जिल्हा परिषेदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलजीवन मिशन मध्ये नळजोडणीचे काम उत्कृष्ठ केल्याबद्दल कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांचा गौरव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.अर्जुन गुंडे सर यांचे हस्ते करण्यात आला.
