सोलापूर दि. 13 (जि.मा.का.):- उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्रमांक 1 सोलापूर उपविभागातील उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यातील जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदावर नेमणूक केली जाणार असुन, सदर जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा हा संबंधित गावच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालय, या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.
पोलीस पाटील पदासाठी दि. 18 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2023 (सुट्टीचे दिवस वगळून) संबंधित तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज स्विकारले जातील. दि. 5 ऑक्टोबर 2023 ते दि. 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पात्र अर्जाचे उमेदवाराची यादी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1. सोलापूर आणि संबंधित तहसिल कार्यालये येथे प्रसिद्ध करण्यात येईल. दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते दि. 19 ऑक्टोबर 2023 प्रवेश पत्र प्राप्त न झाल्यास दि. 20.10.2023 रोजी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1, सोलापूर या कार्यालयात देण्यात येईल. उपविभागीय अधिकारी कार्यालय क्षेत्रातील सोयीच्या ठिकाणी परीक्षा दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 यावेळेत घेण्यात येईल. दिनांक 25ऑक्टोबर 2023 लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची यादी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. 1. सोलापूर आणि संबंधित तहसिल कार्यालये येथे प्रसिध्द करण्यात येईल.
उत्तीर्ण उमेदवारांचे मूळ कागदपत्रांची छाननी व तोंडी मुलाखत उपविभागीय कार्यालय, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. 1, सोलापूर या कार्यालयात दिनांक 26 ऑक्टोबर 2023 ते दि. 31ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 11.00 वाजलेपासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. 1, सोलापूर यांचे कार्यालय येथे शुक्रवार दि. 03 नोहेंबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
इच्छुक व्यक्तींनी जाहीरनाम्यामधील नमुद पात्रता व अटींचे अधिन राहून अर्ज करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.