• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकरी सहवेदनेसाठी 13 ते 19 मार्चदरम्यान निर्धार पदयात्रा, शेतकऱ्यांसह किसानपुत्र होणार सहभागी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2023
in मुख्य बातमी
0
शेतकरी सहवेदनेसाठी 13 ते 19 मार्चदरम्यान निर्धार पदयात्रा, शेतकऱ्यांसह किसानपुत्र होणार सहभागी
0
SHARES
1
VIEWS

येत्या 13 ते 19 मार्चला जळगाव जिल्ह्यातील किनगाव ते धुळे अशी शेतकरी सहवेदनेसाठी निर्धार पदयात्रानिघणार आहे. हे अंतर 110 किलोमीटरचे आहे. या यात्रेत शेतकऱ्यांसह किसानपुत्र आंदोलनातील कार्यकर्ते पूर्णवेळ सहभागी होणार आहेत. डॉ राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) हे यात्रेचे मुख्य संयोजक आहेत. तर सुभाष कच्छवे (परभणी) हे त्यांना सहकार्य करणार आहेत.
पदायात्रेचा किनगाव ते धुळे हाच मार्ग का?
किनगाव (जळगाव) ते धुळे असा पदयात्रेचा मार्ग असणार आहे. 2021 मध्ये औंढा नागनाथ ते चिलगव्हाण (दिवंगत साहेबराव करपे यांचे गाव) अशी सुमारे 225 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. 2022 मध्ये पानगाव (हुतात्मा रमेश मुगे यांचे गाव) ते आंबाजोगाई अशी 35 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. या वर्षी किनगाव (दिवंगत सहकारी कडू आप्पा पाटील यांचे गाव) ते धुळे (दिवंगत रवी देवांग यांची कर्मभूमी) अशी पदयात्रा निघणार आहे. पहिली पदयात्रा मराठवाड्यातून निघून विदर्भात गेली होती. दुसरी मराठवाड्यात निघाली. तिसरी खान्देशात निघणार आहे. कडू आप्पा पाटील हे शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते, किसानपुत्र आंदोलनात सक्रिय होते. त्यांनी जळगाव येथे शिबीर घेतले होते.
शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी कडू आप्पा पाटील यांना तळमळ होती. रवी देवांग हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना गळफास ठरलेल्या कायद्यांचे सुरक्षा कवच बनलेल्या परिशिष्ट नऊची जाहीर होळी केली होती. त्यात त्यांच्यासोबत कडू आप्पाही होते. त्याबद्दल त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शेवटी न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडले होते. शेतकरीविरोधी कायद्यांच्या लढाईला तीव्र करणारे हे दोघे असल्यामुळं किनगाव ते धुळे अशी पदयात्रा काढली जात आहे.
कसा असेल पदयात्रेचा कार्यक्रम
पदयात्रा 13 तारखेला सकाळी नऊ वाजता कडू आप्पा यांना श्रद्धांजलीची सभा घेऊन प्रारंभ होईल. धानोरा करीत अडावदला मुक्काम करेल. 14 मार्चला बारडी वरुन चोपड्याला जाईल. 15 मार्चला निमगव्हाण करुन पाटोदा येथे रात्रीचा मुक्काम करेल. 16 मार्चला गडखांबमार्गे अंमळनेरला पोहोचेल. 17 मार्चला दुपारी जानवे करुन रात्री नवलनगर येथे मुक्काम करेल. 18 मार्चला वणी बु. करीत फागणे येथे मुक्काम करेल. शेवटचा टप्पा 19 मार्चला फागणे ते धुळे असा राहणार आहे. धुळ्यात या यात्रेचा समारोप होईल.पदयात्रेत सभा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिक शेतकरी, नागरिक आणि किसानपुत्रांनी व्यवस्था केली आहे.

Previous Post

धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

Next Post

जयवंत सुरवसे यांचे निधन

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
जयवंत सुरवसे यांचे निधन

जयवंत सुरवसे यांचे निधन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026