सोलापूर :- 30 नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र “अवयव दान दिवस” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ” अवयवदान हे श्रेष्ठदान ” म्हणून ओळखले जाते. अवयव प्रत्यारोपण हा वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार असून त्यामुळे अनेकांना जीवन संजीवनी मिळाली आहेत. “ऑर्गन डोनेशन” चळवळ वाढावी यासाठी सोलापुरातील निमा वुमन्स फोरम यांनी जनजागृती उपक्रम राबविला.
माणसाच्या मृत्यु पश्चात आपल्या शरीरातील डोळे लिव्हर किडनी आदी बरेच अवयव दान करू शकतो. त्यामुळे 10 जणांचे आयुष्य वाचवू शकते. आज समाजामध्ये या महत्वपूर्ण उपक्रमाची चळवळ मोठ्या प्रमाणात चालू व्हावी यासाठी निमा वुमेन्स फोरम यांनी पुढाकार घेतला आहे.
निमा फोरम्सच्या ५० महिला सभासदांनी डिजीटल माध्यमातून प्रत्येकाने स्वतःच्या फोटोसहित प्रबोधन करत सहभाग नोंदविला व आपल्या रुग्णांना पण अवयवदान करण्याचे आवाहन केले.
सदर उपक्रमामध्ये पेशंट व गृहिणींनी उत्स्फूर्त पणे सहभागी होऊन अवयवदानाचा संकल्प केला. अवयव दान करणाऱ्याचे फॉर्म भरून घेण्यात आले. मृत्यूपश्चातही आपले अवयव इतरांच्या कामी यावे त्यासाठी आपण आपले डोळे, त्वचा, हृदय, फुप्फुस, यकृत, किडनी इ. चे दान करू शकतो. अशी माहिती निमा वुमन्स फोरमचे पदाधिकारी डॉ. शितल कुलकर्णी , डॉ. पल्लवी भांगे, डॉ. अश्विनी देगांवकर यांनी दिली. यावेळी भाग्या मंगरूळे, मिनाक्षी पाचकवडे, अनु बुरकुले, निवेदिता गायकवाड , निशा देकाटे आदीनी निमा वुमेन्स फोरमच्या पदाधिका-यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अवयवदानाचा संकल्प केला.