सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांची सोलापूर वैद्यकीय मदत केंद्राचे प्रमुख सुजीत खुर्द यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी नूतन कुलगुरू डॉ. महानवर यांचा सपत्नीक सत्कार सुजीत खुर्द मित्रपरिवार कडून करण्यात आला.
या सत्कार वेळी धनगर समाजाचे प्रतीक समजले जाणारे घोंगडे व भंडारा लावून त्यांचे स्वागत सुजीत खुर्द यांनी केले. यावेळी विद्यापीठ संघर्ष समितीचे संदीप क्षीरसागर ,अभिषेक थोरात, अभिषेक गायकवाड, सम्यक गायकवाड, आकाश बुरुंगे आदी उपस्थित होते.