सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे नुतन खासदार प्रणिती शिंदे यांचे ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल सोलापूर शहर व जिल्हा लिंगायत समाजाचे विविध संघटनेच्या वतीने जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्या शुभ हस्ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील राजकीय कार्यास शुभेच्छा देण्यात आले.
सत्काराला उत्तर देत खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे अभिवचन दिले.समस्त लिंगायत समाजाचे आभार मानले.
या प्रसंगी जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हा सरचिटणीस नामदेव फुलारी,लिंगायत समन्वय समितीचे शहराध्यक्ष सकलेश बाबुळगावकर,टाकळीचे सागर कलशेट्टी,युवा उद्योजक दयानंद शिवयोगी,राष्ट्रीय लिंगायत महामंच चे संघटनेचे नागेश पडणुरे,महात्मा बसवेश्वर वधू वर सूचक मंडळाचे बसय्या स्वामी,संतोष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.