माजी उपमहापौर हरुन सय्यद यांचे निधन

0
38

सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर हरून गफूर सय्यद यांचे दीर्घ आजाराने रविवार (६ ऑगस्ट ) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समय ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, आठ भाऊ ,एक बहीण सूना-जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री चिराग अली कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१२ ते २०१४ च्या दरम्यान ते सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून त्यांनी कार्य केले. १९९२ ते २०१२ या कालावधीत ते सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागात चावीवाला कर्मचारी म्हणून कार्यरत होते. २०१२ साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते.