• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोल्हापुरात आज मंत्र्यांची मांदियाळी, अमित शाह काय बोलणार याची उत्सुकता शिगेला

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2023
in मुख्य बातमी
0
कोल्हापुरात आज मंत्र्यांची मांदियाळी, अमित शाह काय बोलणार याची उत्सुकता शिगेला
0
SHARES
0
VIEWS

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आज कोल्हापुरात असणार आहेत.

कोल्हापुरात आज मंत्र्यांची मादियाळी येणार असल्यानं कोल्हापूरला अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आज कोल्हापुरात असणार आहेत. त्यामुळे शहरात मंत्र्यांची मांदियाळी असणार आहे. विविध कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती असणार आहे. 

सिद्धगिरी मठावर होणाऱ्या सुमंगल महोत्सवाच्या शोभायात्रेला दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामील होतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शोभायात्रा निघणार आहे. त्या अंतर्गत पंचगंगा नदीची आरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर असणार आहेत. त्यांच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी उद्योगमंत्री सामंत दुपारी 12 वाजता महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागांतील बेरोजगार मराठी युवक-युवतींसाठी आयोजित रोजगार मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. कागलच्या अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात हा मेळावा होईल.

अमित शाह यांचा दौरा कार्यक्रम 

दुपारी दीड वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर ते अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जातील. दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि नंतर दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रमास उपस्थिती असेल. त्यानंतर ते हॉटेल पंचशीलकडे रवाना होतील. दुपारी सव्वा तीन वाजता दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाला हजेरी लावतील. सायंकाळी 5 वाजता भाजप कार्यालय, नागाळा पार्ककडे प्रयाण करतील. सायंकाळी 5 ते 6.30 या कालावधीत भाजपच्या विजय संकल्प रॅली होणार आहे. त्यानंतर त्यांचे हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन होईल. या ठिकाणी बैठक होईल. त्यानंतर कोल्हापूर विमानतळावरून रात्री 9.30 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील. 

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार?

एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  आज कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात आहेत.

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.  

Previous Post

शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंचा कॉलेजवयीन मुला-मुलींना मोलाचा सल्ला

Next Post

सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते मायिलसामी वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते मायिलसामी वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते मायिलसामी वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026