छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून पत्रकारांशी संवाद
सोलापूर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मालवणला जात असताना सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकात त्यांनी समाज बांधवांची धावती भेट घेतली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून पत्रकारांशी संवाद साधला.
हा पठ्ठ्या नक्की मेडल आणेल..!
सोलापुरातील धनुर्धर साईराज हणमे याला शुभेच्छा देऊन जरांगे पाटील यांनी सत्कार केला. हा पठ्ठ्या मेडल घेऊन नक्की येईल हा विश्वास त्यांनी दाखवला. तुझा पहिला सत्कार मी करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. साईराजच्या सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
छत्रपतींच्या बाबत कोणीही राजकारण करू नये. ज्यांनी उद्घाटन केले त्यांचा काहीही दोष नाही. मात्र ज्यांनी पुतळा उभारणी केली त्यांना अटक करून कायमस्वरूपी शिक्षा दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, अंतरवाली सराटी या ठिकाणी झालेल्या बैठकीत जगातील सर्वात मोठ्या आंदोलनाची वर्षपूर्ती झाली त्यानिमित्त समाज बांधवांशी चर्चा झाली असे त्यांनी सांगितले.
विधानसभेबाबत आत्ताच भूमिका स्पष्ट करणे योग्य ठरणार नाही असे सांगताना योग्य वेळी नक्कीच सांगेन असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मुस्लिम आरक्षणाबाबत प्रश्नावर उत्तर देताना सध्या मराठा आरक्षण विषय हा ज्वलंत आहे हा प्रश्न सुटला की मुस्लिम आरक्षणासाठी लढा उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी प्रश्नांसाठी नेहमीच तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषणावर ठाम..
जर मराठा आरक्षण प्रश्न सुटला नाही तर उपोषण करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करत असताना इतर विविध प्रश्नांवर मते व्यक्त केली.
यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाज बांधवांची उपस्थितीत लक्षणीय होती.
त्यानंतर मालवणच्या दिशेने प्रयाण केले.
यावेळी ….. सकल मराठा समाजाचे माऊली पवार राजन भाऊ जाधव नानासाहेब काळे विनोद डोंगरे शिवाजीराव चापले सर महेश पवार अमोल भोसले सचिन गुंड दिनेश डोंगरे सचिन पवार चंद्रकांत पात्रे पिंटू माने बब्रुवान माने देशमुख सतीश शिंदे अजहर शेख मतीन बागवान इत्यादी मंडळी मोठ्या संख्येने
उपस्थित होते