• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कृष्णा नदीत प्रदुषणानं माशांचा तडफडून मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2023
in मुख्य बातमी
0
कृष्णा नदीत प्रदुषणानं माशांचा तडफडून मृत्यू
0
SHARES
2
VIEWS

काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ हजारो मासे मृत झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावली होती.
कृष्णा नदीचे प्रदूषण आणि लाखो माशांच्या मृत्यूला ठरल्याप्रकरणी सांगलीतील दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाटबंधारे आणि महावितरण कंपनीने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ हजारो मासे मृत झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावली होती.
घटनास्थळी पंचनामा करून त्याबाबतचा एक उपप्रादेशिक अहवालही उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ अवताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठवला होता. त्यानुसार दखल घेत, दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाला पाणीपुरवठा तोडण्याचे आणि महावितरण कंपनीला वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले. गेली चार दिवस कारवाई झाली नव्हती. मात्र, अखेर आता दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान, कृष्णा नदीतील प्रदूषण प्रकरणी महापालिकेस यापूर्वीच फौजदारी कारवाईची नोटीस मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बजावली आहे. त्यावर महापालिकेने अद्याप खुलासा केलेला नाही.
राजू शेट्टींकडून याचिका दाखल
दरम्यान, कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अ‍ॅड. असिम सरोदे यांच्या मदतीने 13 मार्च रोजी याचिका दाखल केली आहे. पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही प्रतिवादी केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत अ‍ॅड. असिम सरोदे यांच्यासह अ‍ॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी, अ‍ॅड. सुघांशी रोपिया न्यायालयीन काम बघत आहेत. अ‍ॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी हे स्वतः सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांना कृष्णा नदीतील प्रदूषणाचा हा जुना विषय पूर्ण माहिती आहे.
येत्या आठवड्यात सुनावणी होणार
दरम्यान, थेट पर्यावरण न्यायालयात याचिका दाखल झाल्याने संबधित अधिकाऱ्यांची जबादारी तसेच कारखान्याची आणि महानगरपालिकेची चिंता वाढली आहे. या पर्यावरणहित याचिकेची सुनावणी येत्या आठवड्यात तातडीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाच्या न्या. डी. के. सिंह आणि डॉ. विजय कुलकर्णी यांच्या समक्ष होणार आहे. पर्यावरणाची हानी, माशांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाच्या बेजबाबदारपणाचा हिशोब होईल, असे अ‍ॅड.असिम सरोदे यांनी म्हटले आहे.

Previous Post

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापूरमधील बार्शीत गुन्हा दाखल

Next Post

बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी; भाईजानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी; भाईजानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा

बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी; भाईजानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026