येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यपाल महाराष्ट्राचे असो नाहीतर पुदुच्चेरीचे त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात, अशी घणाघाती टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.पुदुच्चेरीत काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रातही ठाकरे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. पुदुच्चेरीतील राजकीय घडामोडींवरुन शिवसेनेने भाजप व राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांना ही कढीपत्त्याप्रमाणे वापरुन फेकून दिले आहे, हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या भाज्यपालांनी समजून घेतलं पाहिजे,’ असे म्हणत शिवसेनेने राज्यपालांवर निशाणा साधला आहे.’पद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ ला सुरुवात करू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. मध्य आता बात पुदुच्चेरीची सुरू आहे, पण जशी ‘दिल्ली बहुत दूर है’ त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’ असे चित्र आहे,’ असंही शिवसेनेने म्हटले आहे.