अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल लिंगायत धर्मगुरूंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

0
17
  • मुंबई – महाराष्ट्राच्या 2023-2024 च्या अर्थसंकल्पात लिंगायत समाजासाठी भरीव तरतूद केल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लिंगायत धर्मगुरूंनी विधान भवन, मुंबई येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले.
  • यावेळी श्री ष ब्र १०८ शांतवीर शिवाचार्य महाराज (औसा), श्री ष ब्र १०८ महादेव शिवाचार्य महाराज (वाई), श्री ष ब्र १०८ श्रीकांत शिवाचार्य महाराज (नागणसूर), श्री ष ब्र १०८ नीलकंठ शिवाचार्य महाराज (मैंदर्गी) आणि श्री ष ब्र १०८ सुगरेश्वर शिवाचार्य स्वामीजी (कर्नाटक) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला व त्यांना आशीर्वाद दिले. आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. अभिमन्यू पवार यावेळी उपस्थित होते.