सोलापूरच्या लेकीनं तब्बल ३८ कि.मी. समुद्रात स्विमिंग करत वर्ल्ड रेकॉर्ड केले

0
37

सोलापूरच्या कीर्ती भराडिया या मुलीने सलग सात तास 21 मिनिटं मुंबईतील समुद्रात स्विमिंग करून तब्बल ३८ किलोमीटरचे अंतर पार केले. गुरुवारी वरळी सी लिंक येथून सकाळी 11 वाजता पोहण्यास सुरुवात केली होती. याचे वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे. अशी माहिती श्याम भराडीया यांनी दिली. सदर विक्रमाचे परीक्षण करण्याकरिता वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित होते.