विधानपरिषद निवडणूक होणारच; भाजपचे ५ विरुद्ध महाविकास आघाडीचे ६ उमेदवार लढणार

0
12

मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे घमासान पाहायला मिळणार आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली असून भापजचे पाच तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार एकमेकांशी भिडणार आहेत.

भाजपच्या वतीने सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज माघार घेतला असून राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीराव गर्जे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्यामुळे आता विधानरपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

विधान परिषदेसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार

शिवसेना
सचिन अहिर
आमश्या पाडवी

राष्ट्रवादी
एकनाथ खडसे
रामराजे नाईक निंबाळकर

काँग्रेस
भाई जगताप
चंद्रकांत हंडोरे

भाजप
प्रवीण दरेकर
उमा खापरे
श्रीकांत भारतीय
राम शिंदे
प्रसाद लाड