कोळा – सांगोला तालुक्यातील पाचेगाव बु. येथे टेंभू योजेनेचा कवठेमहांकाळ येथे पाचेगाव, किडेबिसरी मार्गे जाणारा कॅनॉल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून माण खोऱ्यातील कडेगाव, खानापूर, सांगोला, आटपाडी कवठेमंकाळ या दुष्काळी पट्याला वरदान ठरणारी ही योजना आहे.
टेंभू उपसा सिंचन येजनेचे पाचेगाव बुद्रुक मार्गे किडेबिसरी, नागज व आसपासच्या परिसरात पाण्याचे आवर्तन सुरु होते, टेंभू उपसा सिंचन येजनेचा तीन नंबरचा पंप सुरु केल्यामुळे पाण्याच्या उच्च दाबामुळे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाचेगाव येथे कॅनल फुटन लाखो लिटर पाणी वाया गेले, सदर पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून ज्वारी, बाजरी, मका, डाळींब, पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.