हिंदूराव गोरे यांना आय एस टी ई, इंडिया कडून सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर

0
188

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक चे प्राचार्य दररोज गरजूंना शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न देणाऱ्या रॉबिन हूड आर्मी सोलापूर चे स्वयंसेवक व नको असलेले द्या हवे असलेले घेऊन जावा ह्या धरतीवर कार्य करणाऱ्या माणुसकी फाऊंडेशन सोलापूर चे अध्यक्ष यांना लॉकडाऊन च्या काळात अन्नदानासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र व गोवा या राज्यातून सर्व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांतून ही निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

आय एस टी ई ही संस्था राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या एकूणच सर्व घटकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी कार्य करत आहे.

यंदाच्या वर्षी प्रथमच कोविड च्या काळात समाजातील गरजुंसाठी कार्य करणाऱ्या विविध शिक्षकांमधून ही निवड करण्यात आली आहे.
हिंदुराव गोरे हे गेल्या पाच वर्षापासून सोलापूर मध्ये शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजुंपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत असून आतापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त लोकांपर्यंत अन्न पोहचविण्यात आले आहे. त्याच बरोबर कोविड च्या संकटामध्ये गरजुंपर्यंत ताजे अन्न व किराणा माल हे बॅग ऑफ होप या विशेष उपक्रमांतर्गत पोहोच केल्याने ही निवड करण्यात आली आहे.

सोलापूर मधील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयास आदर्श अभियांत्रिकी संस्था तर हिंदुराव गोरे यांना आदर्श सामाजिक सेवा पुरस्कार पाच ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.