• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई -हैद्राबाद नियोजित बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल केल्यास तीव्र आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2021
in मुख्य बातमी
0
मुंबई -हैद्राबाद नियोजित बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल केल्यास तीव्र आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
  • महाआघाडीने बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल करण्याचे पाप करू नये
  • भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांचा इशारा

सोलापूर : मुंबई-हैद्राबाद या सोलापुरातून जाणाऱ्या नियोजित बुलेट ट्रेनचा मार्ग मराठवाड्यातून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मार्ग बदलण्यासाठी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची ढाल करून राष्ट्रवादी काँग्रेस पडद्यामागील भूमिका चोख बजावत आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने जाणीवपूर्वक सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांना आडकाठी आणून विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात भर घालणार्‍या मुंबई -हैद्राबाद या नियोजित बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल केल्यास भाजप संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिला आहे.

      महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून सोलापूर जिल्ह्यावर सातत्याने अन्याय होताना दिसत आहे. मध्यंतरी उजनीचे पाणी इंदापूर-बारामतीला नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजपच्या आमदार आणि खासदारांनी आवाज उठवल्यानंतर हा निर्णय सरकारला रद्द करावा लागला. मुंबई-हैद्राबाद या सोलापुरातून जाणाऱ्या नियोजित बुलेट ट्रेनचा मार्ग मराठवाड्यातून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुलेट ट्रेनचा मार्ग मराठवाड्यातून नेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही तसे पत्र केंद्राला पाठवले आहे. सदरचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा आशयाचे पत्रच का दिले? हा संशोधनाचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून राज्यातील सर्वच जिल्हे व विभाग सारखेच असतात. मात्र, सदरचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबावाखाली दिले असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे शिवसेना ही सोयसेना झाली असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट ही महत्वाची तीर्थक्षेत्रे असून सोलापूर शहर टेक्सटाईल हब बनू पाहत आहे. सातारा व पुणे जिल्हा औद्योगिक व पर्यटनस्थळांचे जिल्हे म्हणून नावारूपाला आले आहेत. देश-परदेशातून येणारे व्यापारी, पर्यटक, भाविक यांच्यासाठी या बुलेट ट्रेनचा मार्ग अतिसुलभ ठरणार आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील बांधकाम मंत्री असताना अर्थसंकल्पात मंजूर झालेले सोलापूर जिल्ह्यातील राज्यमार्गाचे रस्ते व निधीसुद्धा अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यात पळवून नेला आहे. ही बाब ताजी असताना अशोक चव्हाण यांनी मुंबई -हैद्राबाद नियोजित बुलेट मराठवाड्यातून नेण्याचा घाट घातला आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस बळ देत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर दबाव न टाकता विकासाचा समतोल असाच राहू द्यावा. अन्यथ मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा लढा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली उभा करावा लागेल असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिला आहे.

       मोदी सरकारने मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी दिला आहे. हा मार्ग पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून पुढे कर्नाटकातून आंध्रप्रदेशातील हैद्राबाद या मेट्रोसिटीपर्यंत जोडण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. अंतराच्या आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने हा मार्ग परवडणारा आहे. त्यामुळे या मार्गाचा सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे. हा मार्ग अंतिम टप्प्यात आलेला असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा मार्ग मराठवाड्यातून नेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. सोलापुरात भाजपाची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीचे केवळ चार आमदार असल्यामुळे सातत्याने जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. राज्य सरकार जर या नियोजीत मार्गात बदल करणार असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध राहणार आहे. वेळप्रसंगी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांना घेऊन विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नियोजित मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेनचा मार्ग पुणे, सातारा, सोलापूर असाच राहण्यासाठी पत्र देणार असल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे पत्र व्हायरल झाल्यानंतर खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व खा.शिवाचार्य महास्वामी यांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी खासदारांसमवेत बैठक घेऊन त्यात भूसंपादनाचे काम दोन वर्षात सुरू होईल तर संपूर्ण काम दहा वर्षात पूर्ण होईल असे सांगितले. यावेळी बुलेट ट्रेनचे अधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारने वरील बैठकीचा स्टंट करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका श्रीकांतदादा देशमुख यांनी केली. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मंजूर मार्ग आहे असाच ठेवून अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र बुलेट ट्रेनची मागणी करावी असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिला आहे.

Previous Post

सोलापूर शहरातील ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग उद्यापासून सुरु : प्रशासन अधिकारी

Next Post

तिल्हेहाळ येथील शेतकऱ्यांची केळी एक्पोर्टसाठी परदेशी मार्केटमध्ये

Related Posts

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
Next Post
तिल्हेहाळ येथील शेतकऱ्यांची केळी एक्पोर्टसाठी परदेशी मार्केटमध्ये

तिल्हेहाळ येथील शेतकऱ्यांची केळी एक्पोर्टसाठी परदेशी मार्केटमध्ये

ताज्या बातम्या

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026