येस न्युज मराठी नेटवर्क : टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत बाजी मारली. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सात बाद 150 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून नटराजननं 30 धावात 3 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जाडेजाच्या जागी मैदानात उतरलेल्या चहलनंही 3 फलंदाजांना माघारी धाडलं. या विजयासह टीम इंडियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लोकेश राहुल आणि रविंद्र जाडेजाच्या दमदार खेळीनंमुळे टीम इंडियाला 20 षटकात 7 बाद 161 धावांची मजल मारता आली. राहुलनं 40 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजानं 23 चेंडूत नाबाद 44 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॉईझेस हेन्रिक्सनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर मिचेल स्टार्कनं दोन विकेट्स घेतल्या.