• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2022
in मुख्य बातमी
0
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- शहरात महापालिकेची विकास कामे सुरू आहेत. विकास कामांना भरघोस निधी दिला जाईल. निधीची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शासनाच्या विविध योजनेंतर्गत सोलापूर शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

         भरणे यांनी प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन कोरोना संकट दूर होऊन मोकळे वातावरण तयार होऊ दे, अशी प्रार्थना केली. आघाडी शासनाचे धोरण संकट काळात गोरगरीब जनतेला मदत करण्याचे आहे. प्रत्येकांनी वाद-विवाद टाळून विकासाची कामे करावीत. प्रत्येक विकास कामाला निधी दिला जाईल. काजलनगर येथील उद्यान लहान बालके, वृद्धांना महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

        यावेळी गटनेते महेश कोठे, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, नगरसेवक तौफिक शेख, बाबा मिस्त्री, संतोष पवार, किसन जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

        विजापूर रोड येथील प्रभाग क्रमांक 22 मध्ये पद्मभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार भूमीपूजन आणि दलितमित्र डी.व्ही. फडतरे यांच्या नावाने चौकाचे नामकरण फीत कापून श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका पूनम बनसोडे, अजित बनसोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पैशाचा उपयोग सामाजिक कामासाठी व्हावा – पालकमंत्री

        यानंतर तुळजापूर नाका येथील रूपा भवानी स्मशानभूमीत इलेक्ट्रीक विद्युत दाहिनीचे लोकार्पण श्री. भरणे यांच्या हस्ते झाले. या विद्युत दाहिनीचे काम बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी यांनी सीएसआर निधीमधून केले आहे. यानिमित्त पालकमंत्री श्री. भरणे यांनी सामाजिक कामाबद्दल श्री. रेड्डी यांचे कौतुक करून सन्मान केला. श्री. भरणे यांनी सांगितले की, दानशूरांनी पैशाचा उपयोग सामाजिक कामे, नागरिकांच्या मदतीसाठी करावा.

        यावेळी श्री. रेड्डी यांनी स्मशानभूमीची निगा राखण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाला महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक महेश कोठे, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, संतोष पवार, किसन जाधव यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे उपस्थित होते.

जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता नाही

        कोरोना महामारीत कोणत्याही रूग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी शासनाने घेतली आहे. जिल्ह्यात 190 मेट्रीक टन शासकीय आणि खाजगी प्रकल्पातून ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. लागणाऱ्या ऑक्सिजनच्या तिप्पट ऑक्सिजन आपल्याकडे असल्याने कोणतीही कमतरता नाही, असे आश्वस्तही श्री. भरणे यांनी केले.

        बार्शी रोडवरील भोगाव खत डेपो येथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटच्या उदघाटनप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. हा प्लांट जिल्हा वार्षिक योजनेतून साकारला गेला आहे. याठिकाणी दोन प्लांट असून यांची क्षमता 20 किलोलिटर एवढी आहे. या कार्यक्रमाला महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक महेश कोठे, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, संतोष पवार, किसन जाधव यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे उपस्थित होते.
Previous Post

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
Next Post
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026