सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल व क्वीक हिल फाऊडेंशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम राबविला जातो. या अंतर्गत विद्यापीठात सायबर क्लबचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली व क्विक हिल फाऊडेंशनच्या प्रमुख अनुपमा काटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या उपक्रमाव्दारे समाजातील विविध घटकामध्ये सायबर गुन्हेविषयी माहिती दिली जाते. तसेच अशा प्रकारचे गुन्हे टाळण्यासाठी विविध उपाययोजना सेमीनारव्दारे सांगितले जाते. जसे की ओटीपी कोणास सांगु नये, स्ट्राँग पासवर्ड वापरावा, सोशल मिडीयावर आलेले मेसेजेस व लींकची शहानिशा करावी व आपली माहिती, ही आपली जबाबदारी असे सांगितले जाते.
क्वीक हिल फाऊडेंशनने या वर्षी हा उपक्रम राबविण्यासाठी संकुलातील ३० विद्यार्थ्यांची सायबर वॉरीयर्स म्हणून निवड केली आहे. तसेच ४ विद्यार्थ्यांची सायबर क्लब ऑफीसर्स म्हणून निवड केली आहे. या सायबर क्लबमध्ये कु. मालती जाधव (प्रेसीडेंन्ट), सायली शेळके (सेक्रेटरी) शंकुतला बेल्ले (Community Director) व सुप्रीया शिंदे (PR/ Media Director) यांची निवड केली आहे.
आजच्या डिजीटल युगात समाजामध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे हि काळाची गरज आहे व त्यासाठी विद्यापीठातील सायबर वॉरीयर्स प्रयत्न करतील असे कुलगुरू प्रा.महानवर यांनी आपल्या भाषणात म्हणाले. या उपक्रमाव्दारे सायबर वॉरीयर्समध्ये व्यक्तीमत्वाचा विकास व संभाषण कौशल्यमध्ये सुधारणा होऊ शकते, असे मत क्वीक हिल फाऊडेंशनचे अजय शिर्के यांनी मांडले. काटकर यांनी क्विक हिल या अँटी व्हायरस कंपनीची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीस संकुलाचे संचालक प्रा. व्हि.बी. घुटे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, डॉ. आर. एस. मेंते, डॉ.ए. आर. शिंदे, डॉ. एस. डी. राऊत, डॉ. जे. डी. माशाळे, सी.जी. गार्डी तसेच डॉ. ए.एस.साखरे, संदीप पोटे, सुधीर वाघमारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांचन निकंबे व सयी आवताडे यांनी केले.