No Result
View All Result
- सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अनेक संवर्गीय कर्मचार्यांच्या वेतनत्रुटी अमान्य करून बक्षी समितीने झेडपीच्या कर्मचार्यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली कर्मचार्यांकडून अहवालाच्या प्रतिचे दहन करण्यात आले.
- कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, लिपिकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिवाश गोडसे, कास्ट्राईबचे अरुण क्षीरसागर, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण वंजारी, आरोग्य संघटनेचे नागेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी जि.प. कर्मचारी एकत्र आले.
- यावेळी कर्मचार्यांनी बक्षी अहवालच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने नुकताच बक्षी समितीचा खंड 2 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात जिल्हा परिषदेच्या अनेक संवर्गामध्ये मुख्यत्वे लेखा, लिपिक या संवर्गाच्या कर्मचार्यांच्या वेतनत्रुटी दूर केली नसल्याने कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे स्पष्ट केले. अविनाश गोडसे म्हणाले की झेडपीच्या अनेक कर्मचारी संघटनांनी बक्षी समिती आयोगासमोर त्यांच्या वेतनत्रुटीबाबत साक्ष देऊन आवश्यक ती कागदपत्रे दाखल करूनसुद्धा बक्षी समितीने त्याचा विचार न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उपस्थितांनी बक्षी आयोगाचा निषेध करून अहवालाच्या प्रतिची होळी केली. झेडपी मुख्यालयाबरोबरच करमाळा, बार्शी, मंगळवेढा पंचायत समितीतील कर्मचार्यांनी गटविकास अधिकार्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
No Result
View All Result