सोलापूर : (प्रतिनिधी समाधान रोकडे) : उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील सार्वजनिक निवडणूक पूर्ण होईन आरक्षण सोडत 27 जानेवारीला झाली त्यामुळे काही गावात अनुसूचित जाती तर काही गावात नागरिकांचा मागास प्रवर्गाचे तर काही ठिकाणी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण सोडत झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागेसाठी रशिकेश होत असल्याचे चित्र दिसत आहे.वडाळा गावातील सरपंच पद हे बळीराम काका साठे यांचे चिरंजीव जितेंद्र साठे यांना 31 वर्षानंतर सरपंच पदाची माळ गळ्यात पडणार तर पडसाळी गावातील ग्रामपंचायत बिनविरोध होऊन त्या ठिकाणी सरपंच पद हे अनुसूचित जाती चे निघाले असल्याने अगोदर चे अडीच वर्षे धर्मा रोकडे यांना मिळणार असून पुढचे अडीच वर्षे समाधान रोकडे यांना मिळणार आहे .तर कळमन गावात खुले आरक्षण पडल्याने या गावात शिवसेना राष्ट्रवादी युतीचे पाच तर भाजप चे चार व अपक्ष दोन निवडून आल्याने या ठिकाणी सरपंच पदासाठी चांगली चुरस बगायला मिळणार आहे.त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी चा सरपंच होणार का भाजप चा की अपक्ष च्या गळ्यात सरपंचाची माळ पडणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.










