येस न्युज मराठी नेटवर्क : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वासंती जाधव यांनी केले. इयत्ता बारावी परीक्षेत तसेच इतर स्पर्धा परीक्षेत विशेष यश मिळवणार्या विद्यार्थांना प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक व इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री. अनिल अघोर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गोैरविण्यात आले.आपल्या मनोगतात श्री अनिल अघोर यांनी विद्यार्थांना शिवाजी महाराज, ए. पी. जे अब्दुल कलाम अशा महान व्यक्तींचे आदर्श समोर ठेवावे तसेच स्पर्धा परीक्षा ,अन्य स्पर्धातून भाग घेत जावे व संधीचे सोने करावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री अनिल निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. महाविद्यालयाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून हा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे सांगितले तसेच विद्यार्थांच्या यशात शिक्षकांचा खूप मोठा वाटाआहे. अध्यापनाबरोबर विद्यार्थांवर संस्कार ही केले जातात. भविष्यात एकदा तरी आपल्या महाविद्यालयास भेट द्यावी अशी सदिच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोै. शितल कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सोै. आरती उपलंची यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद , बक्षीसपात्र विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते