• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धाराशिव येथे दहावीच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये उडाला गोंधळ

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2023
in इतर घडामोडी
0
धाराशिव येथे दहावीच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये उडाला गोंधळ
0
SHARES
0
VIEWS
  • धाराशिव – दहावीच्या परीक्षेत शहरातील एका केंद्रावर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी माध्यमाची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी समाेर आला. पेपरची वेळ संपल्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांत एकच गाेंधळ उडाला. पहिल्या पाच मिनिटांतच हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्यांनी परीक्षा हाॅलमधील गुरूजींना कल्पनाही दिली. परंतु, त्यांनी दखल घेतली नाही, असा आराेप विद्यार्थ्यांसह पालकांनी केला.
  • धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूल येथे दहावी परीक्षेचे केंद्र आहे. याच केंद्रातील हाॅल क्र. ४ मध्ये साेमवारी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा तृतीय भाषा इंग्रजी विषयाचा पेपर हाेता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास परीक्षेला सुरूवात झाली असता, हाॅलवरील शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी माध्यमासाठीची प्रथम भाषा इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका वितरित केली.
  • पहिल्या पाच मिनिटांतच ‘‘आपल्याला चुकीची प्रश्नपत्रिका आली आहे’’, असे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तशी कल्पना हाॅलवरील शिक्षकांना दिली. मात्र, दखल घेतली नाही. त्यामुळे सर्व २५ विद्यार्थ्यांनी बदलून आलेला पेपर गपगुमान साेडविण्याचा प्रयत्न केला. तीन तासांचा कालावधी संपल्यानंतर पेपर सुटला. बाहेर उभ्या असलेल्या पालकांना हा प्रकार विद्यार्थ्यांनी सांगितला. यानंतर एकच गाेंधळ उडाला. पालकांनी आक्रमक भूमिका घेत उपस्थित शिक्षकांना जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर पालक अधिक संतप्त झाले. हाॅल क्रं. ४ मधील सर्व विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. याबाबतची माहिती शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाला दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बाेर्ड आता काय निर्णय घेते, याकडे पालकांसह परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.
  • काय म्हणाले शिक्षणाधिकारी?
    धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूलमध्ये साेमवारी मराठी माध्यमाचे २०४, उर्दू ०३ आणि इंग्रजी माध्यमाच्या ४३ विद्यार्थ्यांची परीक्षा हाेती. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा इंग्रजी विषयाच्या प्रत्येकी २५ प्रश्नपत्रिकांची तीन पाकिटे आली हाेती. यापैकी एक पाकिट राखीव हाेते. नेमके हेच पाकीट हाॅल क्र. ४ मधील मराठी माध्यमांच्या मुलांना वितरित केले गेले. प्रत्यक्ष त्यांना तृतीय भाषा इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका देणे अपेक्षित हाेते. हा प्रकार पूर्ण पेपर हाेईपर्यंत मुलांच्या लक्षात आला नाही. परेपर सुटल्यानंतर ही बाब बाहेर थांबलेले पालक तसेच गुरूजींच्या लक्षात आली. माहिती मिळताच हा प्रकार बाेर्डाला कळविण्यात आला आहे. सविस्तर अहवालही दिला जाणार आहे. एकाही मुलाचे नुकसान हाेवू दिले जाणार नाही, अशी ग्वाही बाेर्डाने दिल्याचे शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
Previous Post

मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याची मुलगी झाली उपाधीक्षक; कष्ट आणि जिद्दीने झाली यशाची मानकरी

Next Post

सोलापूर जिल्हा बँक्स असोसिएशनच्या स्वीकृत संचालकपदी दिनकर देशमुख यांची निवड

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा बँक्स असोसिएशनच्या स्वीकृत संचालकपदी दिनकर देशमुख यांची निवड

सोलापूर जिल्हा बँक्स असोसिएशनच्या स्वीकृत संचालकपदी दिनकर देशमुख यांची निवड

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026