सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी च्या माध्यमातून ICCC उभारणी करण्यात आली असून त्याची पाहणी आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली

0
25

सोलापूर— सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी च्या माध्यमातून ICCC (कमांड अँड कन्ट्रोल सेंटर) उभारणी करण्यात आली असून त्याची पाहणी आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली. यावेळी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी,सहाय्यक अभियंता महादेव इंगळे, अवेक्षक कल्याणी बिराजदार, आर्किटेक्चर शशिकांत चिंचोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणेकामी केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अमंलबजावणी करणेकरीता नियंत्रण कक्षाची आवश्यकता असलेने सोलापूर महानगरपालिकेच्या पाठीमागे नगर अभियंता कार्यालयाकडील भांडार गृहाच्या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली असून या इमारतीमध्ये शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसविणेत येणारे सीसीटीव्ही, एलईडी दिवे, कचरा संकलन केंद्राच्या गाड्या, पाणीपुरवठा वितरण प्रणाली व स्काड प्रणाली, ड्रेनेज बाबत तक्रारी,अग्निशमन विभाग,आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आल्याला तक्रारी नोंद घेऊन निवरण करण्यात येईल तसेच यावर एकाच ठिकाणाहुन देखरेख होणार आहे.

तसेच या ठिकाणी नागरिकांकरीता सोलापूर मनपाकडील, पोलिसांकडील आवश्यकत्या सुविधाचे एकत्रीकरण करणेत येणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये स्काडा प्रणालीचे नियंत्रण ही ठेवणेत येणार आहे. तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणेकामी शहरातील १३० ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, आससीसी याद्वारे एकत्रित केले जाणार आहे. तसेच मनपाकडील कांही सेवा याद्वारे देणेत येऊन त्यांचे नियंत्रण केले जाणार आहे.सदरचे काम अंतिम टप्यात असून येत्या 15 ऑगस्ट पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिली.